Friday, June 19, 2020

सातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)

सातपाटील कुलवृत्तांत हे रंगनाथ पठारे यांची कादंबरी वाचली आणि आत्ममग्न झालो. एका घराण्याची कुलगाथा यापुस्तकाद्वारे सांगितली आहे. अगदी अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत त्या कुळाचा आणि त्याअनुषंगाने त्यामधल्या कूटूंबांचा शतकानुशतकांचा प्रवास लेखकाने डोळ्यासमोर उभा केला आहे. मग एखादा कर्तबगार पुरुष पूर्ण घराण्याचा सामाजिक स्तर कसा उंचावतो आणि मग त्यानंतरच्या फुसक्या पिढ्या त्याच्या जीवावर कश्या नांदतात आणि नाश पावतात. महाराष्ट्रातील जाती आणि तत्कालीन परिस्थिती यावर एकूणच विचार करायला लावणारे भाष्य केले आहे. कुलदेवता, मूळ गाव, देवक, आडनाव ह्याच्या मागच्या आपल्या समजुती आणि सत्यपरिस्थिती यात तफावत असू शकते. आणि एकंदरीतच आंतरखंडीय स्थलांतरामुळे आणि वंशसंकरामुळे वंशशुचितेचि कल्पनाच मुळात किती फोल आहे हे पुस्तकातून प्रकर्षाने पुनरबिंबित झाले. कथाकथनाचा लेहजा माननीय नेमाडेंची आठवण करून देतो. हे पुस्तक किंडल वर सुद्धा मिळते.कोसला बद्दल काही सांगायची गरज नाही. मला कोसलाच्या अफलातून अभिवाचनाचे रेकॉर्डिंग मिळाले. कमाल आहे. 

---
शेवटी साहित्य अकादमी ने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मराठी लेखकांनी केलेल्या अभिवाचनाचे रेकॉर्डिंग यु-ट्यूब वर आलेले आहे. नक्की आस्वाद घ्यावा.

No comments: