Saturday, December 22, 2018

२०१८ मागोवा...

२०१७ मध्ये नक्की  गोष्टीची भली मोठी यादी बनवली होती. तांत्रिक, वैज्ञानिक, अध्यात्मिक, छंद जोपासना इत्यादी मिळून साधारण बावीस एक गोष्टी होत्या. त्यातल्या नऊ गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. मला अतिशय आनंद होत आहे कि त्या नऊ गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या.

ज्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या त्या २०१९ च्या यादी मध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. असो.

सर्वार्थाने २०१८ वर्षाने भरभरून दिले. मी स्वतःला पुन्हा एकदा शोधू शकलो. वर्षानुवर्षे चढलेली पूट काढून टाकून पुन्हा एकदा स्वगाभ्या कडे पाह्ण्याची संधी २०१८ मिळणे दिली. मग ते पुन्हा वाचन, लिखाण चालू करणे असो कि स्वतःचे पुनर्मूल्यांकन असो. सर्वच बाबतीत एक प्रकारचे दिव्यत्व आल्यासारखे भासते आहे. जसे जसे आयुष्य अनुभव संपन्न होत गेले त्यानुसार spontanity कडून नियोजनबद्ध गोष्टी करण्याकडे कल वाढू लागला आहे.


No comments: