Sunday, August 27, 2017

.

आमच्या पिढीच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे मंगेशकर कुटुंबाची गाणी. टि वजा केली कि फारसा काही उरत नाही.
--
राजवाडे अँड सन्स पाहिला, खूप आवडला. त्यात सुरुवातीलाच वाढत्या पुण्याच्या सब-अर्बन भागातील नवीन घरात राहायला आलेल्या राजवाडे कुटुंबाच्या आजी म्हणतात "अरे हे कुठे आलो आहोत, आणि हे काय पुणे आहे?" ते दृश्य फारच अंगावर येते. पहिल्या सारखे पुणे राहिले नाही हा माझ्या मागच्या पिढीचा डायलॉग मी इतक्या लवकर म्हणेल असे वाटले नव्हते.
त्यातली डूआलिटी ची थेअरी भन्नाट वाटली.  कुठलाही मनुष्य हा एकाच साच्यात पूर्ण आयुष्य काढू शकत नाही त्याला त्यापेक्षा जास्त साचे असू शकतात आणि त्यात काही गैर नाही.
--
Maywheather आणि  Mcgreggor ची बॉक्सिंग फाईट पाहायला गेलो, बाबांची फार आठवण आली. त्यांनी भोसला मिलिटरी स्कूल मध्ये एका पंजाबी आर्मी ऑफिसर ला हरवले होते. हि आठवण आजी पुन्हा पुन्हा ऐकवायची...
--
पोलॅरॉईड चा इन्स्टा कॅमेरा भन्नाट आहे....त्यातली ब्लॅक आणि व्हाईट फिल्म मागवली आहे. अमृता शेरगील, केकी मूस आणि जिवा म्हशे यांची पुस्तके आणि पैंटिंग अजून शोधात आहे.

No comments: